Sunday 14 August 2022

प्रणाम तुजला : कविता

     अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


                             * प्रणाम तुजला  *



    प्रणाम तुजला कोटी कोटी हे भारतदेशा |

सोशिले किती हाल अपेष्टा अन क्लेशा |


झाले किती आक्रमणे अन् किती सत्ताधीश |

नाही झुकली मान ना झुकले कधी शीष |


किती क्रांतीवीर इथे जन्मले भारतभूसाठी |

झाले किती हुतात्मा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी |


झाला देश स्वतंत्र अमानुष गुलामगिरीतून |

हाक देतो देश आज सुजाण नागरिकातून |


लढतात किती जवान, शहीद होतात जवान |

त्या त्यागाचे स्मरण ठेवू, देऊ  त्यांना  मान |


सत्तेचा अन् श्रेष्ठत्त्वाचा कशाला स्वाभिमान?

देश माझा महान हाच असावा अभिमान |


प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत राहूदे अस्मिता |

‘आपण सारे एकच ' हीच खरी मानवता |


भारतभूचे स्वप्न करू पूर्ण, घडवू नागरीक सुजाण |

हीच खरी देशाची सेवा ,हीच खरी शान |


जन्मलो या पवित्र भूमीवरी भाग्य माझे किती |

मेलो देशासाठी तरी हेच खरे सार्थक अंती |


 वंदन अंती तुजला, माझ्या पवित्र भारतदेशा |

तुझ्यामध्ये समता, बंधुता अन् उदयाच्या आशा |



 सौ. सुवर्णा प्रमोद साळवी. सातारा  मोबा नं. 9588605068


No comments: